Sign In

रॅप - कमर्शियल प्रोजेक्ट्स

फिल्म आणि जाहिरातीसाठी केलेले रॅप प्रोजेक्ट.
All
Youtube
Advertisement
Film
खुर्ची
'लोकमत' वृत्तपत्रासोबत कोलॅबरेशनमधे केलेलं हे राजकीय रॅप. सटायर हा माझा अत्यंत आवडता जॉनर आहे. त्यातून सटायरमधे राजकीय रॅप करणं म्हणजे डबल धमाका. तुम्ही ऐकलंय का हे रॅप? नसेल ऐकलं तर ऐका, नक्की आवडेल.
  1. Youtube
जत्रा
माझा अतिशय आवडता प्रोजेक्ट. ड्रीम कोलॅब असं म्हणता येईल. 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शो सोबत केलेलं 'जत्रा' हे गाणं. डायलॉग रॅप ही खास 'जिब्रिशियन शैली' म्हणून ओळखली जावी अशी आपली इच्छा आहे. त्या दिशेने टाकलेलं हे दुसरं पाऊल. (पहिलं- 'माझ्याशी नीट बोलायचं')
  1. Youtube
दर्जा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी भाडिपासोबत कोलॅबरेशनमधे 'दर्जा महाराष्ट्र माझा' हे गाणं केलं. रॅप लिहिण्यापासून ते रिलीज करेपर्यंतची प्रोसेस ही आजवरची सगळ्यात फास्टेस्ट प्रोसेस होती.
  1. Youtube
प्रेम म्हणजे...!
'स ला ते स ला ना ते' या चित्रपटासाठी केलेलं हे प्रेमावरचं रॅप. प्रेमाची टिपीकल गाणी बरीच आहेत, सतत येत असतात, पण त्या सगळ्यात हे गाणं ठाशीवपणे वेगळं आहे. कसं? ऐकलंत की कळेल!
  1. Film
मिसळ रॅप
महाराष्ट्राचा आवडता खाद्यपदार्थ- 'मिसळ' मिसळबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तयार केलेलं हे रॅप!
  1. Advertisement
सोसायटी टी रॅप
सोसायटी टी ब्रँडसाठी केलेलं रॅप - 'चहा अँथम'
  1. Advertisement
Made with Slashpage