Sign In

Sujay Jibberish

Latest Work

माझा पहिला कथासंग्रह - 'जिब्रीश कथा' प्रकाशित झालाय. सर्व पुस्तकालयांमध्ये उपलब्ध. ऑनलाईनही मागवू शकता-

Rapper

इंडिपेंडेंट प्रोजेक्ट्स
'रॅप' या संगीतप्रकारचं मला वेड आहे. मनातलं जगासमोर थेट मांडण्यासाठी रॅप हा उत्कृष्ट फॉर्म आहे असं मला वाटतं. मी सातत्याने रॅप करत असतो. अनेक गाणी लिहून, रेकॉर्ड करून तयार आहेत. हळूहळू एकेक रिलीज करतोय. जी रिलीज झालीत त्यांची माहिती इथे देतोय.
All
Bhadipa Channel
My Channel
अस्थिरता
माझ्या हृदयाच्या अतिशय समीप असलेलं गाणं. सेन्स ऑफ बिलॉंगिंग नसणं, या जगात आपण उपरे आहोत, परके आहोत असं वाटणं हा माझा स्थायीभाव आहे. हे गाणं त्याबद्दलच आहे. हे गाणं डेमोस्वरूपात आहे. याचं ओरिजिनल व्हर्जन मी नजीकच्या काळात अपलोड करणार आहे. https://youtu.be/xObWBKErcHw?si=pz8L0rIHjRfo6aUC
  1. My Channel
मराठी बोलणारच!
मी मराठी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी समजलीच पाहिजे आणि गरज पडल्यास बोलताही आली पाहिजे असं माझं मत आहे. आपण ज्या प्रांतात राहतो, मोठे होतो, घडतो- तिथली भाषा अवगत होणे, तिथल्या भाषेचा आदर करणे हे अत्यंत गरजेचे आहे असं मला वाटतं. मराठी भाषेचा अमराठी लोकांकडून जो अनादर होतो त्याची मला चीड आहे. मराठी भाषेबद्दल असलेली माझी भूमिका मांडण्यासाठी मी हे रॅप केलं. ऐका आणि अभिप्राय कळवा! https://youtu.be/FnNyIMSIkmQ?si=ViUSZWa96oPK6vhH
  1. My Channel
माझ्याशी नीट बोलायचं
लौकिकार्थाने हे माझं पहिलं रॅप म्हणता येईल. भाडिपासोबतचं पहिलं कोलॅबरेशन. एप्रिल २०२४ मधे हे गाणं इन्स्टाग्रामवर व्हायरल गेलं. मोहन आगाशेंपासून विद्या बालनपर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींनी गाण्यावर रील्स केले. लहान मुलांमध्ये तर हे गाणं प्रचंड पॉप्युलर झालंय. कित्येकांना डायलॉगसकट गाणं तोंडपाठ आहे. तुम्ही ऐकलंय का? नसेल ऐकलं तर लगेच खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा!
  1. Bhadipa Channel
कमर्शियल प्रोजेक्ट्स
मी गेल्या दोन वर्षात अनेक कोलॅबरेशन्स केले. लोकमतसारख्या वृत्तपत्रासोबत, सोनी-मराठीच्या हास्यजत्रेसोबत, भाडिपा या यूट्यूब चॅनेलसोबत. एका सिनेमासाठीही मी रॅप लिहिलं आणि परफॉर्म केलं. येणाऱ्या काळातही बरेच कोलॅबरेशनचे प्रोजेक्ट्स येऊ घातलेत. सर्व प्रोजेक्टसची माहिती खाली देतोय.

Storyteller

मी कथालेखन (अ)नियमितपणे करतो. काही कथा पुस्तकरूपात प्रकाशित झालेल्या आहेत, शिवाय 'कुल्फी', 'अंक निनाद', 'भावार्थ' यांसारख्या दिवाळी अंकांमधूनही प्रकाशित झालेल्या आहेत. काही प्रकाशित आणि काही अप्रकाशित कथा इथे पोस्ट करायच्या, असा मनसुबा आहे.
Poet
रॅप करण्यापूर्वी मी सातत्याने कविता करायचो. आताही करतो, मात्र हल्ली कवितेच्या प्रेरणा, त्यांचा उद्गार आणि स्वरूप बरंच बदललंय. मी या कवितांना 'जिब्रीश कविता' म्हणतो.
Screenwriter
लेखक म्हणून आजवर माझे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत. अनेक प्रोजेक्ट्स येऊ घातलेत.