# Untitled

एकेक इमारत, एकेक रस्ता असं करत 
निगुतीने उतरवून ठेवलंय
छातीवरचं धावतं महानगर...
आता ओसाड माळरानावर मी निश्चल बसून आहे.
निर्मनुष्य गावांचा काफ़िला
याच वाटेने जातो,
असं इथल्याच एका पोक्त बाभळीने 
मला सांगितलंय.

~

एकेक इमारत, एकेक रस्ता 
असं करत 
त्याने निगुतीने उतरवून ठेवलं
छातीवरचं 
धावतं महानगर
आणि 
ओसाड माळरानावरून 
मूकपणे जात असलेल्या
निर्मनुष्य गावांच्या काफ़िल्यात
तो सामील झाला
शहरहीन मनाने

For the site tree, see the [root Markdown](https://slashpage.com/sujayjibberish.md).
